Tuesday, October 26, 2021

NAS च्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी खाली क्लीक करा..

                        NAS प्रश्नपत्रिका  


NAS NATIONAL ACHIEVEMENT SURVEY QUESTIONS (राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण)

राष्ट्रीय उपलब्धि सर्वेक्षण (NAS) हे भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने हाती घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख सर्वेक्षण आहे. राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण यामध्ये NCERT दिल्ली या संस्थेने ठरवून दिलेल्या अध्ययन निष्पतींवर आधारित प्रश्न विचारले जातात. ज्ञान, आकलन व उपयोजन या शैक्षणिक उद्दिष्टांबरोबर मूल्यमापन, विश्लेषण व नवनिर्मिती या उच्च स्तरीय उद्दिष्टांवर आधारित हे NAS NATIONAL ACHIEVEMENT SURVEY (राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण) आहे.

NAS | NATIONAL ACHIEVEMENT SURVEY  (राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण)

NAS विषयी थोडक्यात

भारत सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) दिल्ली, CBSE बोर्ड व SCERT, Pune, Maharashtra राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने संपूर्ण राज्यात एकाच दिवशी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणी NAS Test घेण्यात येणार आहे.

NAS चाचणी

घेण्यात येणारी  चाचणी दिनांक 12 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 10.30 ते 12.30 या कालावधीत सर्वेक्षणामध्ये निवडण्यात आलेल्या शाळेमध्येच घेण्यात येणार आहे.

सर्वेक्षणामध्ये निवडलेल्या शाळांची यादी व निवडलेले वर्ग NAS CBSE CELL व SCERT (SNO) पुणे  कडून प्राप्त होताच त्याप्रमाणे कळविण्यात येईल.

NAS राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण चाचणी इयत्ता 3 री, 5वी, 8 वी व 10 वी साठी घेण्यात येणार असून त्याकरिता  निवडलेल्या वर्गातील CBSE च्या सूचनानुसार वर्गातील एकूण पट 30 पेक्षा जास्त असल्यास वर्गातील एकूण पटापैकी 30 विद्यार्थ्यांची निवड करून निवडलेल्याच विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात येणार आहे.

ज्या वर्गातील विद्यार्थी पटसंख्या 30 पेक्षा कमी असल्यास वर्गातील सर्व विद्यार्थांची NAS चाचणी घेण्यात येणार आहे.

NAS NATIONAL ACHIEVEMENT SURVEY QUESTION

(राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण

NAS राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षणासाठी शाळा आणि त्यातील वर्ग NCERT यांनी स्वतः Random पद्धतीने निवडलेले आहेत.

सर्व्हेक्षणासाठी शाळा निवडताना NCERT कडून s, r1 आणि r2 या ‘शाळांचे वर्गीकरण करण्यात आले आहे.

s (selected), r1 (reserve 1) आणि r2 (reserve 2) या प्राधान्यक्रमानुसार व अपेक्षित निकषानुसार शाळा फायनल केल्या जातील.

NAS राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण चाचणीचे स्वरूप :- objective / MCQ (पर्यायी) प्रकारचे प्रश्न या चाचणी मध्ये असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय असतील. त्यातील योग्य पर्यायाला विद्यार्थ्यांनी गोल (●) करणे अपेक्षित आहे.

विषय- इयत्ता 3 री व 5 वी साठी भाषा, गणित व पर्यावरणशास्त्र (environment science) या तीन घटकावर आधारित एकूण 45 प्रश्नांची एकच NAS राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण चाचणी होणार आहे. (वेळ 60 मिनीट)

इयत्ता 8 वी साठी भाषा, गणित, पर्यावरण शास्त्र (environment science) व सामाजिक शास्त्र (social science) या चार घटकावर आधारित एकूण 60 प्रश्नांची एकच NAS राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण चाचणी होणार आहे. (वेळ 120 मिनीट)

NAS राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण चाचणीसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम नसून सर्व प्रश्न इयत्तानिहाय क्षमतावर आधारित असणार आहेत.

NAS राष्ट्रीय संपादणूक  सर्वेक्षणासाठी जिल्हास्तरावर DMU (District Monitoring Unit) स्थापन केले आहे. यामध्ये DIECPD प्राचार्य, शिक्षणाधिकारी, ज्येष्ठ अधिव्याखाता, अधिव्याखाता, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी या यंत्रणेचा समावेश आहे.

NAS राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण चाचणीच्या दिवशी हे DMU भरारी पथक म्हणून जिल्हास्तरावर काम करेल, जिल्ह्यातील कोणत्याही शाळेवर भेट देण्याचे त्यांचे नियोजन असणार आहे.

NAS राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण चाचणी घेण्यासाठी निवडलेल्या प्रत्येक शाळेमध्ये शासकीय स्तरावरून किमान एक पर्यवेक्षक (Field Investigator) उपलब्ध करून दिला जाणार आहे. यांच्या मार्फतच संबधित वर्गाची NAS राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण चाचणी शाळांनी घ्यावयाची आहे.

मुख्याध्यापकांना NAS | राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण चाचणी परीक्षा कामकाजासंबंधी खालील सूचना

ज्या शाळेची राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणात निवड झालेली आहे त्या  शाळेचा सहभाग अनिवार्य आहे.

NAS राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण चाचणी दिनांक 12 नोव्हेंबर 2021 रोजी निवडलेल्या शाळेतील मुख्याध्यापक सर्व शिक्षक व सर्व विद्यार्थी 100% उपस्थित ठेवावेत.

सदर NAS राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण चाचणी पूर्वकामकाजासाठी शाळाभेटी साठी आलेल्या क्षेत्रीय अन्वेषकांना सर्वेक्षणासाठी आवश्यक ती माहिती मुख्याध्यापक यांनी उपलब्ध करून देण्यात यावी.

NAS राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण चाचणीच्या दिवशी परीक्षा आयोजनासाठी भौतिक सुविधा/वर्गखोली इ. अनुषंगिक सुविधा उपलब्ध मुख्याध्यापक यांनी करून देण्यात याव्यात.

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर NAS राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण चाचणी परीक्षा कामकाज होत असलेने कोविड-19 चे सर्व नियम पाळून परीक्षा कामकाज सुरळीतपणे पूर्ण होण्यास मुख्याध्यापकांनी सहकार्य करावे.

NAS राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण चाचणीच्या दिवशी शाळेमध्ये क्षेत्रीय अन्वेषक (F.I.), निरीक्षक (Observer) व चाचणी कामकाजाचे पाहणी करण्यासाठी भेट देणारे अधिकारी येतील त्यांना शाळा मुख्याध्यापकांनी आवश्यक सहकार्य करावे.

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण संबंधी कामकाज सदर शाळेमध्ये सकाळी 8.00 ते 3.00 वाजेपर्यंत चालणार आहे.

NAS राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षणाच्या अधिक माहितीसाठी https://nas.education.gov.in या संकेतस्थळावर भेट देण्यात यावी.

No comments:

Post a Comment