बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अन्वये शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्याबाबत शासन निर्णय दिनांक 17 जून 2010 रोजी निर्गमित झाला आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील भाग 4 कलम 21 अनुसा प्रत्येक प्राथमिक शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समिती दिनांक 30 सप्टेंबर 2010 पूर्वी स्थापन करणे अनिवार्य राहील शाळा व्यवस्थापन समितीच्या रचनेच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे असतील
# समितीचा कार्यकाल २ वर्ष,२ वर्षानंतर पुनर्रचना.
# मुख्याधापक / केंद्रप्रमुख यांनी शाळा व व्यवस्थापन समितीची रचना / पुनर्रचना करण्यापूर्वी पालकसभेत समितीविषयक सर्व माहिती देणे आवश्यक.
# समितीची रचना राजकीय / सामाजिक दबावाखाली न करता पालकसभेत खेळीमेळीच्या वातावरणात व कायद्यातील / नियमावलीतील तरतुदीच्या आधारे करावी.
# सदर समिती किमान 12 ते 16 लोकांची राहील
# यापैकी किमान 75 टक्के सदस्य बालकांचे आई-वडील किंवा पालक यामधून असतील...
# पालक सदस्यांची निवड पालक सभेतून करण्यात येईल
# उपेक्षित गटातील किंवा दुर्बल घटकातील बालकांच्या मातापित्यांना प्रमाणशीर प्रतिनिधित्व देण्यात येईल
# साधारणपणे पालक सदस्यांची निवड करताना प्रत्येक इयत्तेतील बालकांच्या पालकांना प्रतिनिधित्व मिळेल असे असावे
# उर्वरित 25 टक्के सदस्य पुढील व्यक्तीपैकी असतील
# स्थानिक प्राधिकरणाचे निवडून आलेले प्रतिनिधी एक
# शाळेच्या शिक्षकांमधून शिक्षकांनी निवडलेले शिक्षक एक
# पालकांनी पालक सभेत निवडलेले स्थानिक शिक्षण तज्ञ किंवा बाल विकास तज्ञ एक
# वरील अनु क्रमांक दोन मधील बालकांचे आई-वडील किंवा पालक सदस्यांमधून सदर समिती अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करेल
# शाळेचे मुख्याध्यापक किंवा प्रभारी या समितीचे पदसिद्ध सदस्य सचिव म्हणून काम पाहतील
# या समितीतील एकूण सदस्यांपैकी 50 टक्के सदस्य महिला राहतील.
हा जीआर डाऊनलोड करण्यासाठी पुढील बटन दाबा...
No comments:
Post a Comment