*राजोळेवस्ती शाळेतील मुलांची नावे पोहोचणार मंगळवार*
🚀🚀🚀🚀🚀🚀🚀
या वा-याच्या बसुनी विमानी, सहल करूया गगनाची,चला मुलांनो आज पाहूया ,शाळा चांदोबा गुरूजींची...
बालपणी हे गीत ऐकले नाही असा व्यक्ती विरळच.पण राजोळेवस्ती येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळा थेट मंगळावर भरणार असल्याचे विद्यार्थी सांगतात.त्यासाठी शाळा,शिक्षक,विद्यार्थी,शाळा व्यवस्थापन सदस्य यांचे बोर्डिंग पासही आले आहेत.
सदर उपक्रमाबद्दल मुख्याध्यापक पांडुरंग देवरे म्हणाले कि अमेरिकेच्या नासा ह्या अवकाश संशोधन केंद्राचे मंगळ रोव्हर २०२० हे अंतरिक्ष यान मंगळाच्या दिशेने झेपावणार आहे.त्याबरोबर स्टेनसिल्ड चिपवर आपली नावे पाठवून आपल्या खूणा मंगळ ग्रहावर सोडण्याची संधी नासाने जगभरातील जनतेला दिली आहे.नासाच्या पसाडेना येथील मायक्रोडिव्हाईसेस लँब मध्ये इलेक्ट्रॉनिक चिपचा वापर करून सिलीकाँनच्या चीपवर मानवी केसांच्या एक हजाराच्या भागाइतक्या रूंदीत आपण नोंदवलेली नावे स्टेन्सील केली जाणार आहेत.पहीली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षक व सदस्यांची नावे या उपक्रमात नोंदवली आहेत. त्याचा आँनलाईन बोर्डींग पासचे वाटप शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामदास राजोळे व सदस्य सोनाली राजोळे ,नवनाथ राजोळे,रमेश टिळे,जालिंदर पगार,रोशन जाधव,एकनाथ राजोळे,प्रभाकर गुंजाळ,सुदाम राजोळे,योगेश खालकर,सचिन राजोळे,गणेश उगले,गोविंद पिठे,शंकर राजोळे, बाळासाहेब खालकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या मनात अवकाश संशोधनाप्रती जागरूकता निर्माण करणे त्यांची प्राथमिक माहीती देणे हा या उपक्रमा मागचा प्राथमिक उद्देश आहे.या उपक्रमासाठी मुख्याध्यापक पांडुरंग देवरे, सहशिक्षिका यशस्वी कुंभार्डे यांचे योगदान लाभले.
🛰🛰🛰🛰🛰🛰🛰🛰
ज्ञान घ्या ज्ञान द्या
🛸🛸🛸🛸🛸🛸🛸🛸

No comments:
Post a Comment