राजोळेवस्ती शाळेने साकारलाय ज्ञानकुंभ प्रकल्प. विद्यार्थी गिरवता आहेत स्पर्धा परीक्षांचे धडे.
------------------
टिव्ही ,मोबाईलला देवू फाटा
वाचनाची कास धरू
सामान्य ज्ञानाचे धडे गिरवू
सुजान नागरीक आम्ही होवू.
आजच्या स्पर्धात्मक युगात सामान्य ज्ञान खूपच महत्त्वाचे आहे.विद्यार्थी भाषा गणित इंग्रजी या विषयांत नैपूण्य मिळवतात परंतू सा.ज्ञाना विषयी त्यांच्या मध्ये जागरुकता नसते.म्हणून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास ,चैतन्य व वाचन संस्कृती कशी वाढवता येईल याचा विचार करुन अवांतर वाचन वाढविणे बरोबरच सा.ज्ञानाचे धडे कसे देता येतील याचा विचाराने 'ज्ञानकुंभ' या उपक्रमाची संकल्पना साकारली.
जनरल नाँलेज हे फक्त दै.अध्ययन अध्यापनात किंवा एखादा कोर्स करून मिळत नाही.त्यासाठी लहानपणापासून अवांतर वाचन करण्याची सवय व्हावी लागते.कोणताही चांगला करीअर कोर्स किंवा चांगले काँलेज मध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर प्रवेश परीक्षेचा टप्पा गाठावा लागतो. अधिकारी व्हायचे असेल तर शासनाच्या MPSC,UPSC या सारख्या स्पर्धा परीक्षेचा हिमालय पार करावा लागतो.त्यासाठी सा.ज्ञान अतिशय महत्त्वाचे आहे.या स्पर्धा परीक्षांचे बाळकडू लहान वयात रूजवले गेले पाहीजे.मुलांचे बुध्दी कौशल्य आणि व्यक्तीमत्व प्रभावशाली बनवण्याची जबाबदारी शाळेकडे असते.कोणत्याही स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्याची तयारी असली पाहीजे.तसा आत्मविश्वास मुलांमध्ये यावा म्हणून जि प प्राथमिक शाळा राजोळेवस्ती ने हा उपक्रम सुरू केलाय.या उपक्रमातून मुलांना नक्कीच आनंद मिळून त्यांच्या उज्वल भविष्यासाठी कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी त्यांना सक्षम करण्याचा आमचा मानस आहे.
ह्या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या चौथ्या शनीवारी वी प्रश्न असलेली शाळेची स्वनिर्मित प्रश्नपञिका मुलांकडून बसवून सोडवून घेतली जाते व ती तपासून मुलांना दिली जाते.त्यामुळे मुलांमध्ये जास्तीतजास्त अचूक प्रश्न सोडवता येतील याची चढाओढ लागते.जास्त अचुक उत्तर देणारा विद्यार्थी त्या महिन्याचा विजेता घोषित केला जातो.पूर्ण वर्षे भर चालणाऱ्या या उपक्रमात जास्त वेळेस विजेता ठरणाऱ्या विद्यार्थ्यांस शै.वर्षाच्या शेवटी समारंभपूर्वक ट्राँफी देवून गौरवण्यात येणार आहे.सर्व स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपञ दिले जाणार आहे. उपक्रमास पालकांचा चांगले प्रोत्साहन मिळाले.
आमचे मार्गदर्शक जि.प शिक्षणाधिकारी सौ.झनकर मँडम,गटशिक्षणाधिकारी केशव तुंगार,विस्तार अधिकारी मा.कैलास बोरसे, केंद्र प्रमुख वाघ सर यांचे उपक्रमास मार्गदर्शन लाभले.उपक्रम संयोजन मुख्याध्यापक पांडुरंग देवरे ,उपशिक्षिका यशस्वी कुंभार्डे करत आहेत.
.......................................
सरपंच.. सुवर्णाताई भगुरे.
- या उपक्रमामुळे मुलांना आनंदा बरोबरच ज्ञानाची मेजवानी मिळणार आहे. सरांना आम्ही कायमच मदत करू.
पंचायत समिती सदस्य..
सौ.कमलताई राजोळे.
असा उपक्रम जि प च्या सर्व शाळांमध्ये राबवला गेला पाहीजे.नक्कीच सर्व शाळांना याचा फायदा होईल.शिक्षकांना शुभेच्छा.
मा.सरपंच.. राजेंद्र राजोळे .
जि प शाळांचा दर्जा खूप चांगला आहे. असे उपक्रम जि प शाळेत राबवले गेले तर नक्कीच जि प शाळांचा कायापालट होईल.
गटशिक्षणाधिकारी..केशव तुंगार
राजोळेवस्ती शाळा नेहमीच चांगले उपक्रम राबवते.या उपक्रमास शुभेच्छा...
मुख्याध्यापक .. पांडुरंग देवरे.
मुलांच्या उज्वल भविष्यासाठी असे उपक्रम राबवणे गरजेचे आहे.अध्यापणातही चैतन्य निर्माण होईल.
शिक्षिका. यशस्वी कुंभार्डे.
मुलांना नवनविन ज्ञान घेण्याची इच्छा असते.ते पुरवण्याची जबाबदारी आपली आहे.
📲📲📲📲📲📲📲📲
पोस्ट blog वर ही उपलब्ध ..
deorepg01.blogspot.in
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
ज्ञान घ्या ज्ञान द्या.

No comments:
Post a Comment