Tuesday, March 21, 2017

माझ्या नवीन ब्लॉग ची सुरुवात..

नमस्कार,

     मी आज माझ्या नवीन ब्लॉग ची सुरुवात करत आहे. शिक्षणक्षेत्रात खूप नवीन बदल घडता आहेत.या  बदलांना आपल्याला सामोरे जावे लागणार आहे.  अध्ययन अध्यापन रंजक, आनंददायी, कृतीशील होऊन मुलांचा सर्वांगिण विकास करण्याच्या दृष्टीने आपण आपले अध्यापनात  आवश्यक बदल करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र ही ज्ञानसाधकांची भूमी म्हणून ओळखली जाते. ज्ञानेश्वर माऊली, तुकोबाराय, गाडगेबाबा, यांनी शिक्षणाची महती सांगून त्या काळात त्यांनी जनूकाय शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.त्यानंतर महात्मा ज्योतीराव फुले,सावित्रीबाई फुले ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांनी अवघ्या समाजाला जागृत करून महाराष्ट्रात शिक्षणाची ज्ञानगंगा आणली.अशा महाराष्ट्रात आज आपले अनेक शिक्षक बांधव, प्रामाणिक अधिकारी वर्ग प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडवण्यासाठी जीवाचे रान करत आहे.माझाही या महान कार्यात खारीचा वाटा मिळावा या उद्देशाने या ब्लॉगची निर्मिती केली आहे. शिक्षण क्षेत्रातील माझ्या बंधू भगिनींना नवनवीन माहितीचा खजिना या ब्लॉगच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा माझा मानस आहे. मला सर्वांचे आशीर्वाद पाठीशी असू द्या ही विनंती.                         जय महाराष्ट्र.... जय शिवराय...
ज्ञानज्योत

1 comment:

  1. अभिनंदन सरजी. खूपच छान सुरूवात केलीत.आपण व अपल्या ब्लॉगला उज्वल यशासाठी सानंद शुभेच्छा.

    ReplyDelete